जळगाव;- पूजा चव्हाणप्रकरणी भाजपच्या जिल्हा आघाडीच्या महिलांनी आकाशवाणी चौकात रास्तारोको आंदोलनं करण्याचा प्रयत्न केला . मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेऊन सर्वाना पोलीस ठाण्यात आणून आंदोलक महिलांना सोडण्यात आले.
आकाशवाणी चौकात आज भाजप महिला आघाडीतर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलक येण्यापुर्वीच महिला पोलीस देखील दाखल झाल्या होत्या. भाजपच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते हे एक एक करून आकाशवाणी चौकात ११ वाजेच्या सुमारास एकत्र आले. यावेळी तेथे महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी व जेष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे देखील दाखल झाले. त्यांनी देखील गुन्हा दाखल करणे चुकीचे असल्याची भूमिका घेतली. आंदोलकांना कलम १६६ प्रमाणे अटक व सुटका करण्यात आली.









