शिरपुर :- तालुक्यातील बोराडी येथील अमरधाम व देवमोगरा माता मंदिर परीसरात एकुण 50 झाडे बिरसा ब्रिगेड सातपुडा विभाग संघटनेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. संपूर्ण आदिवासी समाजात एकत्वाची व आत्मसम्मानाची भावना निर्माण करणारे इंग्रजांविरुद्धच्या “ऊलगुलान” आंदोलनाचे प्रणेते क्रांतिसूर्य जननायक भगवान बिरसा मुंडा यांचा प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले . तसेच प्रत्येक ग्रामपंचायत, गावात, पाड्यावर धरती आबा बिरसा मुंडा ह्यांचे स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्याचे देखील आवाहन बिरसा ब्रिगेड सातपुडा संघटनेच्या वतीने समस्त आदिवासी बांधवांना करण्यात आले.
यावेळी शिरपूर पं.स.सदस्य सरिता पावरा,सामाजिक कार्यकर्ते रमण पावरा,कालुसिंग पावरा सर,बिरसा ब्रिगेड चे विभागाध्यक्ष सुंदरलाल पावरा, जिल्हा टिम जगदीश पावरा जिल्हाध्यक्ष,दिपक पावरा उपाध्यक्ष, दशरथ महासचिव,जितेंद्र पावरा प्रसिद्ध प्रमुख तथा शिरपुर तालुका न्युज,नितीन कार्याध्यक्ष, तालुका टिम तालुकाध्यक्ष भरत पावरा, चंदन सचिव,संतोष कार्याध्यक्ष ,यशवंत,जयस चे जगदीश,सर्जेराव व आदिराजे ग्रुप व अनेक समाजबांधव उपस्थित होते..