गावाच्या एकजुटीचे कौतुक; विविध विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात
जळगाव (प्रतिनिधी):- “बिलवाडी गावाने नेहमीच मला भरभरून प्रेम आणि सहकार्य दिले आहे. गावातील ग्रामस्थांची एकजूट ही खरोखरच कौतुकास्पद आहे. गावाजवळील नदीवर पुलाचे काम लवकरच मंजूर करणार असून गावातील चौकाचे सुशोभीकरणही करण्यात येईल. अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. ते बिलवाडी येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.


या कामांचे झाले लोकार्पण व भूमिपूजन
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय संरक्षण भिंत, दलित वस्तीत सामाजिक सभागृह (बौद्ध विहार) व स्मशानभूमीला संरक्षण भिंतीचे लोकार्पण करण्यात आले. तसेच गावांतर्गत काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजनही करण्यात आले. कार्यक्रम जल्लोषपूर्ण वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पालकमंत्री यांचे ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे शाल श्रीफळ व बुके देऊन भव्य सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक साळुंखे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख धोंडू जगताप यांनी मानले.
यांची होती प्रमुख उपस्थिती
सरपंच दिनोद पाटील, उपसरपंच कविता पाटील, जि. प. सदस्य पवन सोनवणे, माजी सभापती नंदू पाटील, उपजिल्हाप्रमुख रवी कापडणे, ग्रा. पं. सदस्य आबा मिस्तरी, अनिल पाटील, सुपडू गायकवाड, समाधान गुजर, लताबाई पाटील, डॉ. भरत पाटील, भगवान पाटील, योगराज गुजर, ह.भ.प. धनराज महाराज, सुधाकर सोनवणे, पोलीस पाटील सुवर्णाताई उमरे, साहेबराव वराडे, सचिन पाटील, बापू थोरात, समाधान बडगुजर, डॉ. सुधाकर पाटील, विजय आमले, राजू पाटील, महेंद्र राजपूत, गोरख पाटील, विश्वनाथ मंडपे, संदीप सुरळकर यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी तसेच बिलवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.











