पाचोरा (प्रतिनिधी ) ;- चर्मकार समाज पाचोरा तालुका व शहर तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघ पाचोरा तालुका व शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आज२५ रोजी शुक्रवारी ११ वाजता बिलवाडी ता. जामनेर येथील मुलीवर लैंगिक शोषण करून तिच्यावर बलात्कार व अत्याचार केल्याप्रकरणी सहा आरोपींना पोलीस प्रशासनाने अटक करून त्यांना पोस्को अंतर्गत तसेच दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हा नोंद केला असून याबाबत आज पाचोरा येथे प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे यांना निवेदन देण्यात आले .
निवेदनात आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे,पीडित कुटुंबातील व्यक्तींना पोलीस संरक्षण मिळाले पाहिजे,तसेच पीडित कुटुंबास शासनाकडून आर्थिक साहाय्य मिळाले पाहिजे याबाबत निवेदन तालुक्यातील चर्मकार समाजाचे जेष्ठ नेते व राष्ट्रीय चर्मकार महासंघ जळगाव जिल्हा जिल्हासंघटक अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली तसेच राज्य शिक्षक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष मनोज पवारयांच्या उपस्थितीत देण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, तालुका सचिव उमेश सोनवणे, कर्मचारी आघाडी जिल्हाध्यक्ष बी बी मोरे, कर्मचारी आघाडी शहराध्यक्ष प्रकाश रोझतकर,युवा आघाडी तालुकाउपाध्यक्ष नितीन बेंडाळे ,गाळण येथील सरपंच राजेंद्र सावंत उपस्थित होते.