जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील बिलखेडा येथे माधवराव श्रावण कुभार ( वय ६२ ) या शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली ते कुभार व्यवसाय व शेती करत होते
माधवराव कुंभार यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगी, २ मुले असा परिवार आहे . पोलीस पाटील मकुदा पाटील यांनी एम आय डी पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर सहाय्यक फोसदार राजेंद्र उगले. पो काॅ स्वप्नील पाटील., हेमंत पाटील यांनी पंचनामा करून मृतदेह जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.