चाळीसगाव तालुक्यातील चंडिकावाडी परिसरातील घटना
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील पाटणादेवी रस्त्यावरील चंडिकावाडी शिवारात शेतात कांदा पिकाला पाणी भरणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्यांना उपचारार्थ चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. तर वन विभागाने परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. या हल्ल्यात शेतकरी नरसिंग राठोड यांच्या डाव्या हातावर व छातीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. वन विभागाने या ठिकाणी तीन ट्रॅप कॅमेरे लावले आहेत.