• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

हिंमतवान मदनने ताकद एकवटून बिबट्याशी दिली झुंज !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 30, 2023
in Uncategorized
0

जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा येथील घटना

भावासह गेला होता सरपण आणायला

जळगाव (प्रतिनिधी) : भावासह जवळच्या रानात सरपण गोळा करायला गेलेल्या भावावर दडी मारून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. मात्र हल्ल्याची चाहूल लागताच गळ्यावर बिबट्याने पंजे मारताच पूर्ण ताकद एकवटून तरुणाने बिबट्याला अंगावरूनच थेट बाजूला फेकले. तसेच आरडाओरडा करू लागला. त्यामुळे हादरलेल्य्या बिबट्याने जंगलात पळ काढला. तरुणाने समयसूचकता दाखविल्याने ‘काळ आला होता, वेळ आली नव्हती’ अशी ही घटना जळगाव तालुक्यात मन्यारखेडा येथे घडली.

मदन सुखदेव अहिरे (वय २५, रा. मन्यारखेडा ता. जळगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. मन्यारखेडा गावात परिवारासह तो राहतो. त्याचा मोठा भाऊ राजेंद्र सुकदेव अहिरे (वय २८) हा त्याला गावापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या रानात सकाळी ११ वाजता सरपण गोळा करायला गेला होता. त्यावेळी राजेंद्र हा थोडा पुढे होता. तर मदन मागे राहून लाकडे गोळा करीत होता. त्यावेळी अचानक झाडीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने मदनवर हल्ला केला. मात्र हल्ल्याची चाहूल लागताच मदनने बिबट्याला पूर्ण ताकद लावून बाजूला फेकले.

या प्रयत्नांत मदनच्या गळ्यावर व उजव्या कानाला बिबट्याने पंजे मारले होते. रक्तबंबाळ झाल्यावरही मदनने हिम्मत ठेऊन आरडाओरडा करून भावाला आवाज दिला. त्यामुळे बिबट्या जंगलात पळून गेला. भाऊ राजेंद्रने धाव घेत जखमी भाऊ मदनला उचलत नागरिकांच्या मदतीने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आणले. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर उपचार सुरु केले. मदनच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच गर्दी केली होती. दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.


 

Previous Post

जळगावात मूसळधार पावसामुळे भिंत कोसळून सुरक्षारक्षकाचा मृत्यू

Next Post

बोदवड बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत शेतकरी पॅनल विजयी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बोदवड बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत शेतकरी पॅनल विजयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

June 21, 2025
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon