पाचोरा (प्रतिनिधी ) तालुक्यातील सोनटेक शिवारात मक्याच्या शेतात बिबट्याने नीलगायवर हल्ला करून ठार केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली असून या घटनेमुळे शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोनटेक शिवारात येथील शेतकरी श्याम पाटील यांच्या मक्याच्या शेतात आज दि. २१ रोजी दुपारच्या सुमारास एका बिबट्याने निलगाईवर हल्ला करत ठार केल्याची घटना घडली असून त्यांनी वेळीच आरडाओरड केल्याने बिबट्याने त्याहून पलायन केले. घटनास्थळी वनविभागाच्या कर्मचाऱयांनी धाव घेतली आहे.