जळगाव ( प्रतिनिधी ) – ऑल इंडिया गोल्ड स्मिथ ट्रेडर्स चेंबर्स ऑफ कॉमर्स म्हणजे एआयजीटीसी या राष्ट्रीय स्तरावरील संघटनेत भैय्याभाऊ भामरे यांची राष्ट्रीय संघटक सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे
सुवर्ण व्यवसाय मधिल विकास व चालना यासाठी ऑल इंडिया गोल्ड स्मिथ ट्रेडर्स चेंबर्स ऑफ कॉमर्स एआयजीटीसीचे मोठे योगदान आहे इंडिया गोल्ड स्मिथ ट्रेडर्स चेंबर्स ऑफ कॉमर्सचे संस्थापक विनायक करोले (नागपूर) , अध्यक्ष प्रवीण शर्मा ( दिल्ली ) यांच्यासह ऑल इंडिया गोल्ड स्मिथ ट्रेडर्स चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय संघटक सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल सुवर्ण व्यवसायमधिल मान्यवर यांनी भैय्याभाऊ भामरे यांचें अभिनंदन केले आहे.