भुसावळ ( प्रतिनिधी ) – शहरातील वाणी मंगल कार्यालय परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचे बंद घराचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ४९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना मंगळवारी २१ नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरण रात्री १० वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती वरून , प्रफुल्ल हरीश इंगोले (वय-३९) रा.वाणी मंगल कार्यालयाजवळ, भुसावळ हा तरुण आपल्या परिवारासह राहायला असून खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. सोमवार २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते २१ नोव्हेंबर सकाळी ६ वाजून २० मिनिटांच्या दरम्यान त्याचे घर बंद होते. दरम्यान अज्ञान चोरट्यांनी बंद घर असल्याचा फायदा घेत घराचा दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत बेडरूममधील कपाटातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ४९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर प्रफुल्ल इंगोले यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड करीत आहे.