नगराध्यक्षपदासाठी रजनी सावकारे विजयाच्या वाटेवर
भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ पालिकेच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीचा रविवारी सकाळी दहा वाजेपासून निकाल जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आतापर्यंत भाजपाच्या उमेदवार रजनी सावकारे यांनी आघाडी घेतली असून त्यांना १६ हजार ६७१ तर प्रतिस्पर्धी शरद पवार गटाच्या गायत्री चेतन भंगाळे यांना ११ हजार ९०३ मते मिळाली आहेत.
४ हजार ७६८ मतांची आघाडी रजनी सावकारे यांनी घेतल्याने भाजपा समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अन्सारी अर्शिया यांना १७३३ तर काँग्रेसच्या सविता सुरवाडे यांना १३१० मते मिळाली असून ४४१ मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला.
भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग क्रमांक एक ‘अ’ मधून पूजा प्रेमचंद तायडे (1349) मतांनी विजयी झाल्या आहेत तर प्रतिस्पर्धी शिवसेना शिंदे गटाच्या ज्योती लक्ष्मण सोयंके (565), अपक्ष सीमा रुपेश धांडे (1180) पराभूत झाल्या तर 82 मतदारांना नोटाचा पर्याय स्वीकारला.
प्रभाग एक ‘ब’ मधून भाजपाचे गिरीश सुरेश महाजन (1462) मतांनी विजयी झाले. त्यांने शिवसेना शिंदे गटाचे अमोल मनोहर इंगळे (880), अपक्ष गिरीश पंडित पाटील (707), निलेश केशव महाजन (62) यांचा पराभव केला. नोटाचा पर्याय 65 मतदारांनी स्वीकारला.
प्रभाग दोन ‘अ’ मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार उल्हास भीमराव पगारे (१५४८) मतांनी विजयी झाले. त्यांनी भाजपा उमेदवार सविता रमेश मकासरे (१५१२), काँग्रेसच्या शुभांगी आनंद सोनवणे (३३१) मतांनी पराभव केला. नोटाचा पर्याय ६५ मतदारांनी स्वीकारला.
प्रभाग दोन ‘ब’ मधून भाजपाच्या प्राची उदय पाटील (1295) विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी पवार गटाच्या रत्नाबाई शांताराम जाधव (1039), अपक्ष उमेदवार ऐन्जिला रितेश नायके (50), अर्चना गणेश सपकाळे (915), मंगला विजय साळवे (99) यांचा पराभव केला. नोटाचा पर्याय 58 मतदारांनी स्वीकारला.
प्रभाग क्रमांक तीन ‘अ’ मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शांताराम दत्तू सुरवाडे (1657) मतांनी विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी पवार गटाच्या आशा विशाल सपकाळे (672), वंचित आघाडीचे रुपेश रमेश गायकवाड (221), कविता सुनील ढिवरे (257), किर्ती सुरेश वानखेडे (80) यांचा पराभव केला. 20 मतदांनी नोटाचा वापर केला.
प्रभाग तीन ‘ब’ मधून काँग्रेसच्या काजल नरेंद्र मोरे (970) विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या साधना रवींद्र भालेराव (930), भाजपाच्या वर्षा गणेश जाधव (318) आदींचा पराभव केला. 27 मतदारांनी नोटा पर्याय स्वीकारला. प्रभाग क्रमांक चार ‘अ’ मधून भाजपा उमेदवार अर्चना विलास सातदिवे (183) मतांनी विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ज्योती रवींद्र सपकाळे (110), अपक्ष अरुणाबाई सुरेश सुरवाडे (126), वंचितच्या सपना जितू संगेले (116) आदींचा पराभव केला. आठ मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला.
प्रभाग क्रमांक पाच ‘अ’ मधून शोभा रणधीर इंगळे (1441) मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उर्मिला रामदास सावकारे (322) यांचा पराभव केला. 44 मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला. प्रभाग पाच ब मधून यापूर्वीच भाजपाचे परीक्षीत बर्हाटे बिनविरोध निवडून आले आहेत.
प्रभाग सहा ‘अ’ मधून सोनम श्रेयस इंगळे (1792) विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी शरदचंद्र पवार गटाच्या गजाला इंद्रीस गवळी (1645) यांचा पराभव केला. प्रभाग सहा ब मधून भाजपाच्या विशाल राजेंद्र नाटकर (1710) मते मिळवून विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार प्रकाश कोळी (965), अपक्ष उमेदवार रामेश्वर रणधीर (825) यांचा पराभव केला. नोटाचा पर्याय 29 मतदारांनी स्वीकारला.
प्रभाग सात ‘अ’ मधून प्रीती मुकेश पाटील या यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत तर प्रभाग सात ‘ब’ मधून अपक्ष उमेदवार सुजित हेमराज पाटील (1897) विजयी झाले. त्यांनी प्रतिपर्धी भाजपाचे दिग्गज नेते अजय एकनाथ भोळे (1232), शरदचंद्र पवार गटाचे संजय झेंडू रायपूरे (235) यांचा पराभव केला. नोटाचा वापर 45 मतदारांनी केला. प्रभाग आठ ‘अ’ मध्ये भाजपाच्या अनिता सतीश सपकाळे (4556) मतांनी विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मानसी प्रदीप सपकाळे (597), अजित पवार गटाच्या त्रिवेणी भीमराज कोळी (644) यांचा पराभव केला. नोटाचा पर्याय 122 मतदारांनी स्वीकारला.
प्रभाग आठ ‘ब’ मधून शिवसेना शिंदे गटाचे शारदा दीपक धांडे (2829) मतांनी विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार विशाल सतीश जंगले (1923), अपक्ष उमेदवार अक्षय रमेश भोई (524) यांचा पराभव केला. 53 मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला. प्रभाग नऊमधील काका-पुतण्याच्या लढतीत भाजपाचे युवराज लोणारी यांनी पुतण्या जयंत लोणारी यांचा पराभव केला. प्रभाग नऊ ‘अ’ मधून भाजपाचे युवराज दगडू लोणारी (2231) मते मिळवून विजयी झाले. त्यांनी पुतण्या तथा प्रतिस्पर्धी व शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार जयंत लोणारी (1585) यांचा पराभव केला. 60 मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला.
प्रभाग नऊ ‘ब’ मधून भाजपाच्या उमेदवार पूनम वसंत पाटील (2120) मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार युगंधरा गोपाळ जंगले (नारखेडे 1098), अजित पवार गटाचे ममता अजय डागोर (504) पराभव केला. नोटाचा वापर 97 मतदारांनी केला. प्रभाग क्रमांक दहा ‘अ’ मधून सोनी संतोष बारसे (2711) मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी शरदचंद्र पवार गटाचे रामदास श्रावण सावकारे (595), काँग्रेसचे प्रमोद नकवाल (398) यांचा पराभव केला. 85 मतदारांनी नोटाचे बटण दाबले.
प्रभाग दहा ‘ब’ मधून भाजपाच्या प्रिया बोधराज चौधरी (2780) विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी अपक्ष सीमा संतोष थामेत (541), शरदचंद्र पवार गटाच्या रुपाली दीपक नेमाडे (381) यांचा पराभव केला. 87 मतदारांना नोटाचे बटण दाबले. प्रभाग क्रमांक 11 अ मधून शिवसेना शिंदे गटाचे बबलू सुरेश बर्हाटे (1723) मते मिळवून विजयी झाले. त्यांनी अपक्ष उमेदवार नीळकंठ रामदास भारंबे (1232) यांचा पराभव केला. 47 मतदारांनी नोटा पर्याय स्वीकारला.
प्रभाग क्रमांक 12 अ मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शेख दिलनबाज ईकबाल (3420) विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार शाह हसीनाबी अब्बास (551), भाजपाचे योगीता वायकोळे (248) यांचा पराभव केला. नोटाचा पर्याय 80 मतदारांनी स्वीकारला. प्रभाग 13 अ मधून काँग्रेसचे रोहन राजू सूर्यवंशी (1836) विजयी झाले. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे नंदा प्रकाश निकम (938) यांचा पराभव केला. 129 मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला.
प्रभाग 13 ब मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सुनीता कृष्णधनकर (धोनी) (1192) विजयी झाल्या. त्यांनी भाजपाच्या प्रतिस्पर्धी आशादेवी राकेश ओझा (1135), अपक्ष उमेदवार सोनाली विनोद निकम (613), अपक्ष उमेदवार वैष्णवी आशिष तिवारी (403) पराभव केला. नोटाचा पर्याय 80 मतदारांनी स्वीकारला. प्रभाग 14 अ मधून भाजपाचे उमेदवार राजेंद्र दत्तू आवटे (1855) विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार जयेश संतोष चौधरी (1346) पराभव केला. 51 मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला.
प्रभाग १४ ब मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सुभद्रा गणपत गुंजाळ (१५३२) विजयी झाल्या. त्यांनी भाजपाच्या अंकिता राजेंद्र खोले-पाटील (१४८३) यांचा पराभव केला. 45 मतदारांनी नोटाचे बटन दाबले. प्रभाग 15 अ मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या अमीन निसार कुरेशी (1963) विजयी झाल्या. त्यांनी भाजपाच्या अनिता पाटील (551), अपक्ष शेख मुस्ताक शेख सरदार (695) यांचा पराभव केला. नोटाचा वापर 23 मतदारांनी केला.
प्रभाग 15 ब मधून शरदचंद्र पवार गटाच्या शेख नसीम बी.शेख नदीम (2064) विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार शेख सिद्रा आरीफ (761) यांचा पराभव केला. नोटाचा वापर 49 मतदारांनी केला. प्रभाग 16 अ मधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सचिन भास्कर पाटील (1897) विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी अजित पवार गटाचे शेख समीर रशीद (862) व भाजपाचे सदाशीव पाटील (551) यांचा पराभव केला. 49 मतदारांनी नोटाचे बटण दाबले. प्रभाग 16 ब मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पल्लवी निलेश कोलते (1749) विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी शरद पवार गटाचे नमिरा शकील पिंजारी (1254) यांचा पराभव केला. 31 उमेदवारांनी नोटाचा वापर केला.
प्रभाग क्रमांक 17 अ मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अकिल नादर पिंजारी (2097) विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बागवान शेख नजीम नथ्थू (1332) यांचा पराभव केला. 15 मतदारांनी नोटाचे बटण दाबले. प्रभाग 17 ब मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शबाना सिकंदर खान (1990) विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या खान नूरजहाँ आशिक (1384) पराभव केला. 49 मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला.









