भुसावळ ( प्रतिनिधी ) – गाडी पार्किंग लावण्याच्या कारणावरून शहरातील शारदा नगरात महिलेचा विनयभंग करत पती व मुलाला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना मंगळवारी १३ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ शहरातील शारदा नगरात ४३ वर्षीय महिला आपल्या पती आणि मुलासह राहायला आहे. बुधवार १३ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता गाडी पार्कींग लावण्याच्या कारणावरून याच परिसरात राहणारे भरत बेंडाळे आणि विशाल बेंडाळे यांनी महिलेचे पती आणि त्यांच्या मुलाला शिवीगाळ केली. त्यानंतर महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत त्यांचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिला आपले पती व मुलासह भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून रात्री १० वाजता संशयित आरोपी भरत बेंडाळे आणि विशाल बेंडाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहम्मद अली सैय्यद हे करीत आहे.