भुसावळ तालुक्यातील सावतर शिवारातील घटना
भुसावळ : शेतातून भामट्याने 37 हजार रुपये किंमतीचे कोंबड्यासह बकर्यांचे पिलू लांबविल्याची घटना भुसावळ तालुक्यातील सावतर शिवारात 25 जूनच्या मध्यरात्री घडली असून अज्ञात चोरट्याविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
उदय नारायण देशमुख (64, वरणगाव, ता.भुसावळ) यांचे सावतर शिवारात त्यांचे शेत असून शेतातून चोरट्याने 22 हजार रुपये किंमतीच्या दोन मोठ्या बकर्या, 12 हजार रुपये किंमतीचे बकरीचे तीन पिलू तसेच तीन हजार रुपये किंमतीच्या सहा कोंबड्या लांबवल्या. चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर शेतकर्याने वरणगाव पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास सहाय्यक निरीक्षक भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मनोहर राजाराम पाटील करीत आहेत.