• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 19, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!

एलसीबीसह भुसावळ बाजारपेठ,  तालुका पोलिसांचा तपास

जळगाव ( प्रतिनिधी ) – भुसावळ येथील गायत्री नगरमधून १५ लाखांहून अधिक किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांनी मोठा मुद्देमाल शिरपूर येथे एका खाजगी गोदामात लपवला होता. भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी जळगाव स्थानिक गुन्हे शाखा, भुसावळ तालुका पोलिसांच्या मदतीने हा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/06/WhatsApp-Video-2025-06-19-at-5.01.28-PM.mp4

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत १८ लाख ८० हजार रुपये असून, यात फ्रिज, वॉशिंग मशीन, एसी आणि एलईडी टीव्ही यांचा समावेश आहे. दि. १५ जून रोजी मध्यरात्री नंदलाल मिलकीराम मकडीया यांच्या गायत्री नगर येथील राजस्थान मार्बलच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या गोदामाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी गोदामात प्रवेश केला. (केसीएन)त्यांनी गोदामातून एकूण ३५ हजार रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, ज्यात फ्रिज, वॉशिंग मशीन, एसी आणि एलईडी टीव्ही चोरून नेल्या होत्या.

याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान, वरिष्ठांच्या आदेशानुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव आणि भुसावळ तालुका पोलीस स्टेशनच्या पथकांनी समांतर तपास सुरू केला. चोरी झालेल्या मालाच्या ठिकाणाबाबत तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीची खात्री केली असता, सदरचा मुद्देमाल शिरपूर शहरातील करवंद रोड, महावीर लॉन्स येथील एका खाजगी पत्र्याच्या गोदामात ठेवलेला असल्याचे निष्पन्न झाले.पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून १८ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

तसेच, गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल ज्या खाजगी गोदामात ठेवण्यात आला होता, त्याचे मालक मुजावर जामील शेख चांद (वय ४८, रा. न्यु बोराडी ता. शिरपूर, ह.मु. गणेश कॉलनी आर सी पटेल उर्दू शाळे जवळ शिरपूर) आणि जफर शेख मुजावर (वय २४, रा. मुजावर मोहल्ला शिरपूर ता. शिरपूर जि. धुळे) यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी भुसावळचे कृष्णात पिंगळे, स्था गु शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

यात उप विभागीय पोलीस अधिकारी भुसावळचे उमाकांत पाटील, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पो हे कॉ विजय नेरकर, पो हे कॉ संदीप धनगर, पो शि सचिन चौधरी, पो शि प्रशांत परदेशी, पो शि योगेश माळी, पो शि अमर अढाळे, पो शि प्रशांत सोनार, पो शि भूषण चौधरी, पो शि राहुल वानखेडे, पो शि जावेद शहा, स्था गु शाखा पथक पो उप निरी शेखर डोमाळे,(केसीएन)सहा फौज रवी नरवाडे, पो हे कॉ गोपाळ गव्हाळे, पो हे कॉ मुरलीधर धरगर, पो हे कॉ संदीप चव्हाण, पो हे कॉ प्रविण भालेराव, चालक भरत पाटील, भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पो हे कॉ महेश चौधरी, पो शि राहुल भोई यांचा समावेश होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राहुल टि वाघ, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हे करीत आहेत.


 

Tags: #jalgaon & busawal crime news #maharashtra
Previous Post

किरकोळ कारणावरून अल्पवयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Next Post

मेव्हण्याने दिली शालकाविरुद्ध तक्रार : ४ किलो सोने घेतले पण परतच केले नाही, ३ कोटींची फसवणूक..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

मेव्हण्याने दिली शालकाविरुद्ध तक्रार : ४ किलो सोने घेतले पण परतच केले नाही, ३ कोटींची फसवणूक..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon