पहाटे व्यापाऱ्याचे २५ लाखांचे नुकसान
भुसावळ (प्रतिनिधी) :- शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याने सुमारे २५ लाख २० हजारांचे मोठे नुकसान झाल्याची घटना सोमवारी दि. २५ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजता समोर आली आहे. याप्रकरणी भूसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.
भुसावळ शहरातील सिंधी कॉलनीत राकेश महेशलाल कुकरेजा (वय ३०) परिवारासह राहतात. त्यांचे सिंधी कॉलनी परिसरात आनंद ड्रेस मटेरियल नावाचे कापडाचे दुकान चालवून असून त्यावर ते उदरनिर्वाह करतात. सोमवारी दि. २५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री ३.३० वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या कापड दुकानाला भीषण आग लागली. या आगीत सुमारे २५ लाख २० हजार रूपयांचा मुद्देमाल जळून खाक झाले आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ प्रशांत देशमुख हे करीत आहे.