भुसावळ ( प्रतिनिधी ) – शहरातील मुस्लिम कॉलनी येथे बंद घराचे कुलूप तोडून घरातील रोकडसह दागिने असा एकूण २३ हजारांचा ऐवज चोरटयांनी चोरून नेल्याचा प्रकार ३ ऑगस्ट रोजी उघडकीस आला असून याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी की, सैय्यद वाशीम सैय्यद, रा. मुस्लिम कॉलनी यांच्या बंद घराच्या मुख्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी २० हजार रोख आणि ३ हजारांचे सोन्याचे मणी असा एकूण २३ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार २ ते ३ ऑगष्टच्या दरम्यान घडला . याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.