भुसावळ ( प्रतिनिधी ) – एकाच कुटुंबातील चौघा जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना भुसावळमध्ये उघडकीस आली आहे. कोरोना काळात घरात अन्नाचा कण नाही, त्यामुळे जगून काय करणार? आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असं म्हणत चौघा जणांनी जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.
‘संसार रिक्षेची चाके चालवणाऱ्या कोरोना काळात थांबली. यामुळे आर्थिक विवंचनेसह मुलांची चिंता लागली. घरात अन्नाचा कण नाही. यामुळे जगून काय करणार? आत्महत्येशिवाय पर्याय नाही ‘ अशी तोडक्यामोडक्या भाषेत चिठ्ठी लिहून प्रेरणा नगरात राहणाऱ्या कुटुंबाने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला.
आई-वडील, मुलगा आणि मुलीने उंदीर मारण्याचे विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार भुसावळ येथे उघडकीस आला. या चौघांवर गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.