भुसावळ शहरातील व्यायामशाळेतील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) :- शहरातील श्री संत गाडगेबाबा महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षातील विद्यार्थ्याने व्यायामशाळेत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचे वडील व्यायामशाळेत आले तेव्हा त्यांना त्यांचा मुलगा गळफ़ास लावून घेतल्याचे दिसले. ही घटना रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत तरुणाचे नाव करण मनोहर पाटील (वय २१) असे आहे. तो संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाला होता. दरम्यान, रविवारी जुन्या तालुका पोलिस ठाण्याच्या मागील व्यायाम शाळेत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.(केसीएन)करण पाटीलचे वडील हनुमान व्यायामशाळेत गेल्या पंधरा वर्षांपासून जात आहेत. आज दुपारी ते नित्य-नियमाप्रमाणे दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास व्यायामशाळेत गेले असता त्यांना समोर त्यांचा मुलगा गळफास घेतल्याचे दिसले.
हे बघून त्यांना धक्काच बसला. परिसरातील युवकांनी व नागरिकांनी खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. करण हा महाविद्यालयात हॉस्टेलमध्ये राहत होता.(केसीएन)शनिवारी हॉस्टेलमधून घरी आला. दुपारी मित्रांसोबत गप्पा मारल्या, तेव्हा हसत खेळत होता. कुठलाही ताणतणाव दिसत नव्हता. अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली. तो एकुलता एक होता. घटनेची माहिती कळताच बाजारपेठ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.