जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ विभागात गुरुवारी दि. २१ रोजी ६८ वा रेल्वे सप्ताह २०२३ आयोजित करण्यात आला होता. या रेल्वे सप्ताहचे विशेष आयोजन करण्यामागे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये सर्वोत्तम कार्यपद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे सेवा पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो . विशिष्ट क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी विभागाला शिल्ड प्रदान केले जात असतात.
या सप्ताह कार्यक्रमात प्रमुख पाहुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पाण्डेय होते. त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वप्रथम त्यांनी विभागाने केलेली कामगिरी आणि कार्याची माहिती सांगितली. या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाप्रबंधक पुरस्कार प्राप्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमामध्ये रेल सेवा आणि उत्कृष्ट कार्यासाठी पुरस्कार एकूण ०५ अधिकारी आणि ३५४ रेल्वे कर्मचारी यांना इति पाण्डेय यांच्याद्वारे प्रशस्तीपत्र देऊन सम्मानित करण्यात आले. भुसावळ विभागातील विविध डेपोला एकूण १८ शिल्ड देण्यात आल्या. १६ ग्रुपला नगद पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्पेंद्र कापडे यांनी केले. प्रस्तावनेत एन एस काजी, वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी यांनी रेल सप्ताह आयोजित करण्याचे उद्धेश सांगितले. कार्यक्रमामध्ये सुनील कुमार सुमन, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन), एम के मीना, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) सर्व शाखाचे अधिकारी , मंडळ महिला कल्याण समितीचे सदस्य, युनियनचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.