भुसावळ (प्रतिनिधी) :- विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक धीरेंद्र सिंग आणि सहायक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट चेकिंग) रत्नाकर क्षीरसागर यांच्या नेतृत्वात भुसावळ विभागाचे ५३७ तिकीट तपासणी कर्मचारी यांनी दिनांक ०९ ते दि. १५ नोव्हेंबर पर्यंत भुसावळ विभागामध्ये सखोल तिकीट तपासणी मोहिम राबवून भुसावळ विभागाचा नवीन विक्रम प्रस्थपित केला.
परिणाम स्वरूप विनातिकीट/अनधिकृत प्रवासाच्या एकूण ४१८९४ प्रकरणांतून एकूण रु. ३. ७३ करोड रुपये दंड वसूल करण्यात आला.
ह्या मोहिमेच्या परिणाम स्वरूप दिनांक ११.११.२०२३ रोजी भुसावळ मंडळाच्या इतिहासातील सर्वाधिक तिकीट तपासणीच्या आज पर्यंतच्या दंड वसुलीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत एकूण ७३७० प्रवाश्यांकडून एकूण ६८.८५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.
सर्व अधिकृत रेल्वे प्रवाशांना आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा सुनिश्चित करण्यासाठी, भुसावळ विभागात विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मेल एक्स्प्रेस, सुविधा ट्रेन्स , विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणीचे कार्य करण्यात येते.
प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी, भुसावळ विभाग प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊनच प्रवास करावा असे आवाहन करीत आहे.