एससी ८, एसटी ७, ओबीसी ४, खुल्या प्रवर्गाचे २० आरक्षण जाहीर
जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची सोडत तहसीलदारांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यात एससी ८, एसटी ७, ओबीसी ४, खुल्या संवर्गातील २० आरक्षण निघाले आहे. यामुळे आता गावातील राजकारणाचा धुराळा उडणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांपैकी एक द्वितीयांश पदे महिलांसाठी आरक्षित करण्यात येणार आहेत. यात अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला यांचा समावेश आहे. यासाठी तालुकानिहाय सभांचे आयोजन करण्यात आले आहे.(केजीएन) दि. २१ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, भुसावळ येथील ताप्ती सभागृह येथे तहसिलदार निता लबडे यांनी भुसावळ तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढणेबाबत कार्यवाही पूर्ण केली. तरी सरपंच पदाचे आरक्षण निश्चीत करणेत आलेले आहे. सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी अनुसूचित जाती या प्रवर्गाच्या सरपंच पदासाठी आलेल्या ८ ग्रामपंचायतीची सोडत निघाली.
यात पिंपळगाव खु/, वांजोळे-मिरगव्हाण, खंडाळे, खडके, चोरवड-खेडी बु., हतनूर- सावतर निभोर खु., आचेगांव, कुऱ्हे प्र.न. यांचा समावेश आहे. अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आलेल्या ७ ग्रामपंचायतीमध्ये टहाकळी, दर्यापूर, कन्हाळे बु/, किन्ही, फुलगाव, साकरी, फेकरी यांचा समावेश आहे. तळवेल हे २००० ते २००५ या वर्षात आतापर्यंत फक्त एकदाच नामाप्रसाठी आरक्षित झाल्याने सन २०२५-३० करता थेटपणे आरक्षित करण्यात येत आहे.(केजीएन)तर सदर वराडसिम, मन्यारखेडे, शिंदी, वेल्हाळे, कंडारी, ओझरखेडा या ग्रामपंचायतीमधून पारदर्शक बरणीमध्ये चिठ्या टाकुन त्यामधुन अज्ञान बालक नामे रुजल चौधरी (वय ८ वर्ष) या बालकाच्या हस्ते एक-एक करुन एकूण ३ ग्रामपंचायतीच्या चिठ्ठया काढण्यात आल्या. तळवेल ग्रामपंचायती सहचिठ्ठी काढून सन २०२५-२०३० कालावधीकरता ३ ग्रामपंचायती निश्चित करण्यात आल्यात. यात तळवेल, विल्हाळे, ओझरखेडे, मन्यारखेडे हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झालेत.
यानंतर सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी सर्वसाधारण प्रवर्गसाठी २० ग्रामपंचायती निश्चित करण्यात आलेल्या आहेत. यात काहुरखेडा-मानपुर, पिंप्रीसेकम-निंभोरा बु/, सुसरी, जोगलखेडा-भानखेडा प्र.ए., सुनसगाव-गोभी, गोजोरा, मोंढाळे, पिपळगांव बु/, साकेगांव, मांडवेदिगर भिलमळी, अंजनसोडे, कन्हाळे खु/, बोहर्डी बु.-बोहर्डी खु/, बेलव्हाय, जाडगांव, कठोरे बु/, कठोरे खु./, वराडसीम, शिंदी, कंडारी यांचा समावेश आहे.(केजीएन)वरीलप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण या सर्व प्रवर्गासाठी सरपंच पदासाठी सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी ग्रामपंचायतीमध्ये आरक्षणाची कार्यवाही पुर्ण करण्यात आले. सदर आरक्षण सोडती करीता भुसावळ तालुक्यातील अनेक गावांचे ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्टीत नागरीक तसेच तहसिल कार्यालय भुसावळ येथील कर्मचारी सुनिता खडके, जितेश चौधरी, निलेश कोळी व सचिन पाटील यांची उपस्थिती होती. तसेच दि. २२ रोजी उपविभागीय अधिकारी, भुसावळ भाग यांचे उपस्थितीत त्यांच्या कार्यालयात महिला आरक्षण निश्चीत केले जाणार आहे.