जळगांव कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे निवेदन
जळगांव ( प्रतिनिधी ) – कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे भारतीय रेल्वेच्या भुसावळ विभाग अंतर्गत भुसावळ–जळगाव ते रामदेवरा (राजस्थान) दरम्यान स्वतंत्र रेल्वे गाडी सुरू करण्यात यावी, या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. राजस्थान राज्यातील रामदेवरा येथे बाबा रामदेव यांच्या दर्शनासाठी जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील कंजरभाट, मारवाडी, राजस्थानी, मेहतर, बंजारा समाजाचे लाखो भाविक दरवर्षी जात असतात.

मात्र थेट रेल्वे सुविधा नसल्यामुळे प्रवाशांना बदल्या गाड्यांचा पर्याय स्वीकारावा लागतो व मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन स्वतंत्र रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदन भुसावळ येथील विभागीय रेल्वे कार्यालयात सहाय्यक विभागीय व्यवस्थापक सुमन साहेब यांना देण्यात आले. यावेळी कंजरभाट समाज युवा फाउंडेशनचे सचिव राहुल नेतलेकर, खजिनदार योगेश बागडे, सदस्य उमेश माछरेकर, वीर दहियेकर, नितीन बागडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.









