कजगावाच्या ग्रामस्थांचे रेल्वे विभागीय व्यवस्थापकांना निवेदन
भडगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील कजगाव येथील ग्रामस्थांनी भुसावळ – देवळाली व भुसावळ – मुंबई पेसेंजर पूर्ववत करावी या मागणीसाठी भुसावळ रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक एस एस केडिया यांना निवेदन दिले .
अडीच वर्षोपासून पेसेंजर बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे खाजगी वाहनाचे भाडे परवडत नसल्याने तसेच इंधनवाढीमुळे वाहने परवडत नाहीत त्यामुळे नागरिकांचे नुकसान होत आहे भुसावळ – देवळाली व मुंबई – भुसावळ पेसेंजर बंद असल्याने या गाड्यांवर अवलंबून असलेल्यांचे बरेच धंदे बंद आहेत त्यांच्या पोटपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे कोरोनाकाळात शासनाने बंद केलेली पेसेंजर रेल्वे सेवा पुन्हा सुरू करावी अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे
रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस एस केडीया यांना निवेदन देताना माजी ग्रा प सदस्य अनिल महाजन , नितीन सोनार, संजय महाजन, नाना पाटील, आशिष वाणी, रविंद्र पाटील , परमेश्वर महाजन, पप्पू पाटील, शाहिद मणियार , नारायण राजपूत, भरत शिंपी, सागर कुमावत, ईश्वर बोरसे, रियाज खाटीक आदी उपस्थित होते.
कजगावचे कार्यकर्ते रवींद्र पाटील पाटील यांनी खासदार उन्मेष पाटील यांनाही निवेदनाची कल्पना दिली दिल्लीत असलेले खासदार पाटील यांनी पेसेंजर बाबत लवकर दिल्लीहून आल्यावर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस एस केडिया यांच्याशी चर्चा करून भुसावळ – देवळाली व भुसावळ – मुंबई पेसेंजरबाबत निर्णय होईल असे सांगितले त्यामुळे खासदारांकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.