भुसावळ (प्रतिनिधी) : येथील रेल्वेच्या भुसावळ मंडळातर्फे चित्रकला प्रेमींसाठी उत्साहवर्धक चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना त्यांची सर्जनशीलता दाखवण्याची अनोखी संधीचा अनेकांनी लाभ घेतला.
स्पर्धा दि. १४ ते १५ जूनपर्यंत आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचा समारोप करताना स्पर्धकांना पुरस्कार वितरण करण्यात आले. या वितरण समारंभामध्ये जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पाण्डेय मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. याठिकाणी अतुल मालखेडे, प्राचार्य, सप्तकुल महाविद्यालय खिरोदा, अरविंद बडगुजर, अनुभूती विद्यालय, जळगाव आणि डॉ. इंद्राणी मिश्रा सहभागी होते.
स्पर्धेमध्ये एकूण चार स्पर्धकांना पारितोषिक वितरित करण्यात आले. प्रथम पारितोषिक निलेश शिंपी, द्वितीय पारितोषिक अतुल राठोड, तृतीय पारितोषिक सचिन आणि अनिकेत देवगिर तसेच चौथे पारितोषिक वेवोतालू केजो यांना देण्यात आले. या स्पर्धा मध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून एकूण ५० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. यावेळी समारंभामध्ये प्रसंगी अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) सुनील कुमार सुमन, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) एम के मीना आणि सर्व शाखाचे अधिकारी एवं कर्मचारी सहभागी होते. समारंभाचे आभार वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांनी केले. सहभागी स्पर्धकांना भुसावळ मंडळातर्फे स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि बक्षीस देण्यात आले.