भुसावळ ( प्रतिनिधी ) – कुटुंब लग्नाला गेल्याची संधी चोरट्यांनी साधत घरफोडी करून 40 हजारांच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना शहरात गुरुवारी सकाळी उघडकीस आली,
रत्ना राजेश परदेशी (रा.डॉक्टर इक्बाल यांच्या दवाखान्याजवळ) लग्नासाठी 23 जानेवारीला धुळे येथे कुटुंबीयांसमवेत गेल्या होत्या 10 दिवसांनंतर त्या 3 फेब्रुवारी रोजी सकाळी भुसावळातील घरी आल्यानंतर त्यांचा चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडत प्रवेश करीत सुटकेसमध्ये ठेवलेले 20 हजार रोख तसेच 20 हजारांचे दागिने लांबविले. पो नि राहुल गायकवाड, निलेश चौधरी, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, प्रशांत सोनार, जितेंद्र पाटील यांनी पाहणी केली. तपास हवालदार विजय नेरकर करीत आहेत.