भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळच्या औद्योगिक वसाहतीच्या एका कंपनीतून अज्ञात चोरटयांनी तांब्याच्या तारांचे बंडल आणि २५ हजार रोख असा ऐकून २ लाख ९२ हजार ७५० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे खळबळ उडाली आहे.
औद्योगिक वसाहत शेड क्रमांक २० मधील जय केबल इंडस्ट्री आहे. अज्ञात चोरट्यांनी २८ जानेवारीच्या रात्री ८ ते ३० जानेवारीच्या सकाळी ९ वाजेच्या दरम्यान, २ लाख १२ हजार ५०० रुपये किंमतीचे २० तांब्याच्या तारांचे बंडल याच बरोबर ५५ तांब्याच्या तारांचे बंडल आणि २५ हजार रोख असा ऐकून २ लाख ९२ हजार ७५० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी नरेश काकुमल अडवाणी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.