अकोट ( प्रतिनिधी ) – जिल्हा वार्षिक योजनेमधुन मंजूर करण्यात आलेल्या तसेच अनेक वर्षापासून रखडलेल्या चोहोट्टा ते करतवाडी या रस्त्याचे भूमिपूजन अकोला पूर्व मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हा परिषद सद्स्य गोपाल पेठे यांच्या प्रयत्नातून हा रस्ता मंजूर करण्यात आला. २५ लाख रुपये कामासाठी मंजूर करण्यात आले आहे. या रस्त्याचे काम ताबडतोब सुरू करण्यात यावे असे निर्देश आमदार सावरकर यांनी प्रशासनाला दिले.







