पाचोरा ( प्रतिनिधी ) – येथील उपविभागीय अधिकारी यांच्यासाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानाचे भूमिपूजन आज आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .
आ.किशोर अप्पा पाटील यांच्या पाठपुराव्यामूळे तत्कालीन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या कार्यकाळात सूरु झालेल्या प्रांताधिकारी निवासाच्या प्रवासाची फलनिष्पत्ती झाली असून ५९ लक्ष रुपये खर्चाचे हे निवासस्थान शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात उभारण्यात येणार आहे या शासकीय निवास्थानाचे भूमिपूजन बुधवारी आमदार किशोर पाटील यांचे हस्ते झाले.
यावेळी प्रांताधिकारी डॉ विक्रम बांदल , माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी उपनगराध्यक्ष गंगाराम पाटील, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, शिवसेना शहर प्रमुख किशोर बारावकर, नंदू पाटील, प्रवीण पाटील , आमदारांचे स्वीय सहाय्यक राजेश पाटील, शरद तावडे, अमोल पाटील, राजू पाटील, प्रवीण ब्राह्मणे, सुमीत सावंत, आबा कुमावत, जितू पेंढारकर, एकनाथ पाटील , बांधकाम विभागाचे उपअभियंता शेलार , कनिष्ठ अभियंता काजवे यांची उपस्थिती होती. खुशाल जोशी यांनी विधिवत पूजा केली . आ.किशोर पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे या मागणीचा पाठपुरावा केला होता.
पाचोऱ्यात तहसीलदार, पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, अभियंते, पोलीस बांधव यांच्यासाठी देखील निवारा असावा प्रत्येक गावात तलाठी कार्यालय असावे यासाठी पाठपुरावा सुरू असून लवकरच सर्व अधिकाऱ्यांच्या व पोलीस निवासस्थानाचा प्रश्नदेखील मार्गी लागणार आहे , असे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले .