मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती
जामनेर तालुक्यातील ग्रामस्थांना फायदा
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील वाघूर उपसा जलसिंचन योजना आणि त्या अंतर्गत ३८१० शेततळ्यांचे व शेततळ्यापर्यंत जोडणाऱ्या पाईपलाईनचे तसेच वाघुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील विविध नदी नाल्यावर ४७ गतिरोधक बंधारे बांधण्याचे कामाचा शुभारंभ राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम गारखेडा ता. जामनेर येथे झाला.
वाघूर उपसा सिंचन योजना क्रमांक १ च्या लाभक्षेत्रातील आंबील होळ देवीचे, चिंचखेडा, देवपिंपरी, डोहरी, गाळेगाव, गारखेडा बुद्रुक, गोंडखेल, हिंगणे निम कसबे, हिवरखेडा बुद्रुक, जामनेर, करमाड, केकतनिंभोरा, खादगाव या गावांचा समावेश आहे.
तसेच वाघूर उपसा जलसिंचन योजना क्रमांक २ चा लाभक्षेत्रातील गावे भराडी, बिलखेडे, खोदोली, देवपिंपरी, कुंभारी सिम, लाखोली, मोहाडी, नाचणखेडे, नांद्रे ओझर खुर्द, जामनेर, करमाड, सामरोद, पिंपरखेड, लहासर, माळपिंपरी बुद्रुक, ओझर बुद्रुक, टाकळी खुर्द, वाकी खुर्द यांच्यासह इतर गावांचा लाभक्षेत्रात समावेश आहे असे सर्व ४६ गावे आहेत.
कार्यक्रमाच्या वेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, व्ही.डी. पाटील, संजय गरुड, जे. के. चव्हाण, अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे , भाजप तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर , माजी जि.प. अध्पयक्ष दिलीप खोडपेसर. जितेंद्र पाटील कमलाकर पाटील, निलेश चव्हाण, अशोक पाटील,माधव पाटील आदी दाधिकारी उपस्थित होते. जामनेर तालुक्यातील रस्ते व गावागावात होणाऱ्या विकास कामांचा आढावा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला. यावेळी कार्यकर्त्यांसह गारखेडा परिसरातील सरपंच व इतर पदाधिकारी उपस्थित होते.