उद्या महापौर,विरोधी पक्षनेता नाथाभाऊंच्या भेटीला ; मनपाच्या राजकारणात खळबळ
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील शिवसेनेत गटातटाचे राजकारण सुरू झाले असून लवकरच एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.जळगाव शहराचे राजकारण गेल्या काही दिवसापासून चांगलेच तापले आहे.
सध्यास्थितीत जळगाव शहर शिवसेनेत उभी फुट पडली असून दोन गट निर्माण झाले आहेत. नुकतेच शिवसेनेचे नेते संजय राऊत हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येऊन गेले त्या दौऱ्यात महापौर जयश्री महाजन व मनपाचे विरोधीपक्ष नेते सुनील महाजन यांना कार्यक्रमाच्या नियोजना पासून दूर ठेवण्याचा प्रकार काही लोकांकडून होतांना दिसून आला, तसेच सध्या एकनाथराव खडसे यांच्याशी विरोधी पक्ष नेते सुनील महाजन यांची वाढलेली जवळीक यामुळे लवकरच एक मोठा भूकंप होणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत. उद्या शिवसेनेच्या महापौर जयश्री महाजन आणि विरोधी पक्षनेते सुनील महाजन हे दोघे राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांची भेट घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.येणाऱ्या काळात आजुन काय बदल होणार हे बघायला मिळणार आहे