पारोळा तालुक्यातील घटना
पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील पळासखेडेसिम येथे सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी गेलेल्या एकाचा विसर्जन स्थळी पाटाच्या पाण्यात पाय घसरून पडल्याने एकाचा बुडून मृत्यू झाला. तालुक्यातील पळासखेडेसिम येथे यंदा ‘एक गाव एक गणपती’ होता.
अनंत चतुर्थीच्या दिवशी गावातील सर्व नागरिकांनी महिलांनी मोठ्या वाजतगाजत गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठी मिरवणूक काढली. गणपतीचे विसर्जन गावाजवळील एका मोठ्या पाण्याच्या पाटावर होणार होते. यावेळी गणपतीची पूजा करून गणपतीचे विसर्जन स्थळी मनोज हिरालाल पाटील (वय ५३, रा. पळासखेडेसिम) यांचा पाय घसरून ५० फूट खोल पाटात पडले.
पाण्यात बुडाल्यानंतर उपस्थितांनी लगेच शोधकार्य सुरू केले. परंतु नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई असा परिवार आहे. भाऊसाहेब हिलाल पाटील यांनी पोलिस ठाण्यात माहिती दिली. आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.