जळगाव ( प्रतिनिधी ) — भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेच्या जिल्हा कार्यकारणीची बैठक आज जिल्हाध्यक्ष गणेश घोपे , राज्य उपाध्यक्ष शेख गुलाब मामू व उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष संतोष पवार यांच्या उपस्थितीत झाली
जळगाव जिल्हा कार्यकारणीसह तालुक्यामधील पदाधिकाऱ्यांना अन्याय आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारासह भ्रष्टाचार विरोधी माहिती देऊन जिल्हा व तालुक्यांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली
जिल्हा कार्याध्यक्ष हिम्मतराव पाटील , मुख्य सचिव विनोद बेरभैया , संपर्कप्रमुख अतुल महाजन , सल्लागार एड प्रवीण पाटील., महानगर अध्यक्ष दिलीप साळुंखे यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या
ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यांना सरसकट एक लाख रुपयाची मदत शासनाने करावी अशी मागणी या संघटनेने केली आहे.