जळगाव(प्रतिनिधी) – तालुका पो.स्टे.हद्दीत भोलाणे गावात डोंगर दरी तापी नदी किनारी पोलीस पथकाने जंगलात अवैध गावठी हातभट्टी धंद्यांवर धाडी टाकल्या. यात ४ संशयीत आरोपींवर धडक कारवाई आज दि.11 रोजी पहाटे 5.30 करण्यात आली. जळगावचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, सहा. पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार अवैध धंद्यावर कारवाई करण्याची मोहीम राबविण्यात आली.
यावेळी 4 हातभट्टी दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. एकूण 62 लोखंडी प्लास्टिक ड्रम, 200 लिटरचे त्यात 6 हजार 200 लिटर कच्चे पक्के रसायन, किं. 62 हजार रुपये व गावठी हातभट्टीची 120 लिटर तयार दारू किंमत 4800 रुपये असा एकूण 66 हजार 800 रुपयेचा मुद्देमाल नष्ट करण्यात आलेला आहे. ड्रम फोडून रसायन नष्ट करण्यात आलेले आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
यात पोकॉ धर्मेद्र ठाकूर यांच्या फिर्यादीवरून आकाश रामकृष्ण कोळी, तर पोकॉ ठाकूर यांच्या दुसऱ्या फिर्यादीवरून तुषार महारू सोनवणे, पोना सुशील पाटील यांच्या फिर्यादीवरून समाधान डिगंबर कोळी याच्यावर तर पोकॉ दीपक कोळी यांचे फिर्यादीवरून भूषण दशरथ कोळी यांच्यावर कारवाई करण्यात आली. सर्व घटनांचा पंचनामा करण्यात आला असून तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ बापू पाटील, पोना सुधाकर शिंदे, विलास शिंदे, सुशील पाटील, दिपक कोळी यांच्या पथकाने केली.