जळगाव ( प्रतिनिधी ) ;- तालुक्यातील भोकर येथील आरोग्य उपकेंद्रात लसीकरण सुरु करण्याची मागणी जळगाव (ग्रामीण ) तालुका काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, भोकर गावात सध्या कोरोनामुळे भीतीचे वातावरण असून गावात ४५ दिवसांत १० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. गावातील आणि परिसरातील नागरिकांना १८ किमी दूर असणाऱ्या कानळदा आरोग्य उपकेंद्रावर लसीकरणासाठी जावे लागत आहे. गर्दी टाळण्यासाठी येथील आरोग्य केंद्रात लसीकरण सुरु करण्यात यावे अशी मागणी तालुकाध्यक्ष मनोज चौधरी,चेतन सोनवणे, पुंडलिक सोनवणे, दीपक पवार , आदींनी निवेदनाद्वारे केली आहे.