पाचोरा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील भोजे येथील एका ३० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली
भोजे येथील रहिवाशी योगेश संतोष पवार (वय – ३० ) याने आज सकाळी राहत्या घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली. त्यावेळी घरात कोणीही नव्हते. त्याचे आई व वडिल बाहेर गेलेले होते. काही वेळानंतर आई घरी परतल्यानंतर त्यांना योगेश छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यास पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी मृत घोषित केले.
पुढील तपास सपोनि कृष्णा भोये यांचे मार्गदर्शनाखाली पी. एस. आय. डिगंबर थोरात करीत आहेत . मयत योगेश पवार याचे पश्चात आई, वडिल, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. योगेश पवार याने आत्महत्या का केली ? याचे कारण मात्र लगेच समजू शकले नाही.