जळगाव ( प्रतिनिधी ) – पारोळा तालुक्यातील भोकरबारी येथे घराची भिंत पडल्याच्या कारणावरून ११ जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण करून धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले . पारोळा पोलीस ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरेश युवराज पाटील (वय-३२ , रा. भोकरबारी ता. पारोळा ) हे कुटुंबियांसह राहतात. २० ऑक्टोबररोजी सायंकाळी नरेश पाटील आईसोबत घरात असतांना शेजारी विनोद पाटील, विकास पाटील, केवल पाटील, भुषण पाटील, आशु पाटील, दिपक पाटील, उषा पाटील, छाया पाटील, वैशाली पाटील, सुरूबाई पाटील आणि मनिषा पाटील ( सर्व रा. भोकरबारी ) यांनी घराची भिंत का पाडली या कारणावरून शिवीगाळ व मारहाण केली. विकास पाटील याने नरेश पाटील याच्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले विषारी औषध पाजण्याचाही प्रयत्न केला. या भांडणात गल्लीतील नागरीकांनी सोडवासोडव केली. नरेश पाटील यांच्या फिर्यादीवरून या ११ जणांविरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि निलेश गायकवाड करीत आहेत.