कजगांव ता भडगाव ;– येथील ब. ज. हिरण माध्यमिक विद्यालयातील शिक्षक तथा आदिवासी व अहिराणी साहित्यिक सुनील गायकवाड यांची दि. 9 आगस्ट 2021 रोजी होणाऱ्या साहित्य अकादमी, भारत सरकार नवी दिल्ली आयोजित कार्यक्रमांत निवड करण्यात आली आहे जागतिक आदिवासी दिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे भारत @75 “आदिवासी कविता की तलाश”हे या कार्यक्रमाचे सदर असून
भारतीय आदिवासी भाषे मधील निवडक ७५ कवी यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे देशातील ७५ कवींमध्ये सुनील गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे साहित्य अकादमी नवी दिल्ली आयोजित ऑनलाईन साहित्य संमेलनात सुनील गायकवाड यांची भीली भीलाऊ बोली ची साहित्य अकादमी कडून दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. यापूर्वी २५ तें २७ फ़ेबृवारी २०१७ रोजी संपन्न झालेल्या संमेलनात ही सुनील गायकवाड यांना निमंत्रित केले होते. तसेच साहित्य अकादमी नवी दिल्ली व रमनिका फाऊंडेशन नवी दिल्ली नें देखील सुनील गायकवाड यांच्या “धाड” या कथेची निवड भारतीय आदिवासी ५१ कथाकारा मध्ये केली होती.
सुनील गायकवाड, यांचे भौगऱ्या, गल्लूर, पावरी,कोयता, बाडगीनी धार, आदिवासी भीलाऊ आदिवासी लोकसाहित्य इत्यादी ग्रंथ प्रकाशित झाले आहेत…
सुनील गायकवाड यांचे महात्मा गांधी विद्या प्रसारक मंडळ संचालित बबनबाई जवरीलाल हिरण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मार्फत संस्थेचे अध्यक्ष मंगेश पाटील उपाध्यक्ष दिनकर पाटील सचिव रत्नाताई पाटील सहसचिव पंजाबराव देवकर व संचालक मंडळाने व विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. के. पवार व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून व कजगाव परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.








