शेतकर्यांना त्वरित आर्थिकभरपाई मिळावी

वडती ता. चोपडा प्रतिनिधी :-
चोपडा ता.भाजपा व भाजयु मोर्चाच्या पदधिकारांच्या वतीने शेतकरी हिताच्या विविध मागंण्यांसाठी तहसिलदार श्री.अनिल गावित यांना निवेदन देण्यात आले.
गेल्या 15 ते 20 दिवसांपासून तालुक्यात वादळं,अवकाळी अतिवृष्टिमुळे शेतकऱ्यांचे कांदा ज्वारी,मका,कापुस,सोयाबीन, मुग व उडीद,ऊस इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतकरी बंधु फार मोठ्या आस्मानी संकटात सापडला आहे..सर्व पिके कवडीमोल झालेले आहेत म्हणून राज्य शासनाने त्वरीत पंचनाम्याचे आदेश देऊन चोपडा तालुका ओला दुष्काळ जाहिर करावा व शासनाने संकटात सापडलेला शेतकऱ्याला त्वरित आर्थिक मदत करावी.. अन्यथा भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा चोपडा कडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.असे निवेदन दिले.
यावेळी भारतीय जनता पार्टी चे तालुकाध्यक्ष पंकज पाटील,शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल,भाजयुमोर्चा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हा चिटणीस राकेश पाटील,शेतकी संघाचे संचालक हिंमतराव पाटील,कृ.उ.बा.समिती संचालक धनंजय पाटील,भरत पाटील,तापी सुतगिरणी संचालिका सौ.रंजनाताई नेवे,ता.उपाध्यक्ष चंद्रशेखर ठाकरे,सरचिटणीस डाॅ.मनोहर बडगुज,चंद्रकांत धनगर,जिल्हा संवाद संयोजक भरत सोनगिरे,भाजयुमो शहराध्यक्ष तुषार पाठक,सरचिटणीस अमोल पाटील,लक्ष्मण पाटील,उपाध्यक्ष प्रविण चौधरी,गोपाल चौधरी,विजय बाविस्कर,अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष संजय श्रावगी,तेजस जैन,मोहित भावे सचिन धनगर,ज्ञानेश्वर चौधरी, आदि पदाधिकारी ,कार्यकर्ते,शेतकरी बांधव यांनी मा.तहसिलदार सोा.यांना स्वाक्षरीचे निवेदन देवून राज्य शासनाने याकामी त्वरित लक्ष देवून शेतकरी बांधवांना न्याय द्यावा अशी मागणी केली.







