जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील निवृत्तीनगरात घडलेल्या वाळू व्यावसायिक भावेश पाटील हत्याकांडातील दोन्ही आरोपींना जळगाव पोलिसांच्या पथकाने पुण्यातील तळेगाव रोड परिसरातून अटक केली आहे .
जिल्हापेठ पोलीस २४ ऑगस्टरोजी हा गुन्हा दाखल झाला होता आरोपी मनिष नरेंद्र पाटील ( रा. अहमदाबादवाडा आव्हाणे ) व भुषण रघुनाथ सपकाळे ( रा. डॉ. आंबेडकर पुतळया मागे खेडी खुर्द ) यांनी मयत भावेश उत्तम पाटील ( वय ३२ रा. आव्हाणे , ह.मु.स्वामी समर्थ केंद्राजवळ निवृत्तीनगर, जळगाव) याचा पूर्ववैमस्यातुन निवृत्तीननगर भागातील बंधन बँकसमोर धारदार हत्याराने वार करून खुन करून फरार झाले होते.
पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी , सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना सुचना दिल्या. पो नि किरणकुमार बकाले यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपी पुणे येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी पोलीस अंमलदार रवि नरवाडे, पोहेकॉ संजय हिवरकर, राजेश मेंढे, पोना संतोष मायकल, मुरलीधर बारी यांचे पथक पुणे येथे शासकिय वाहनाने रवाना केले या आरोपीचा पुणे शहरात शोध घेतला असता ते पुणे शहरात पुणे तळेगाव रोडने जात असल्याचे दिसल्याने आज सकाळी ७.३० वाजता दोन्ही आरोपीतांना शिताफीने ताब्यात घेतले . त्यांना पुढील कारवाईसाठी जिल्हापेट पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
निवृत्ती नगरात राहणाऱ्या भावेश उत्तम पाटीलवर चॉपरने हल्ला करून त्याला या आरोपींनी जागीच ठार केले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलिसांनी तत्काळ परिस्थिती हाताळत संशयितांची नावे निष्पन्न केली होती . त्यानंतर त्यांच्या मागावर पथक रवाना केले होते.