भडगाव तालुक्यातील भातखंडे येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- भडगाव तालुक्यातील भातखंडे येथील एका प्रौढ महिलेने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असताना मंगळवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक नोंद घेण्यात आली आहे.
सत्यभामा कांतीलाल पाटील (वय ६१, रा. भातखंडे ता. भडगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. ते गावात परिवारासह राहत होते. कष्टकरी परिवारातील असलेल्या सत्यभामा पाटील यांनी दि. ४ नोव्हेंबर रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथून दि. ६ नोव्हेंबर रोजी सत्यभामा पाटील यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, उपचार सुरु असताना सत्यभामा पाटील यांचा मंगळवारी दि. १९ रोजी उपचार सुरु असताना संध्याकाळी ६ वाजता मृत्यू झाला आहे. यावेळी कुटुंबीयांनी शोक व्यक्त केला. घटनेची जिल्हापेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.