अखिल भटका जोशी समाज सेवा संघाच्या राज्य कार्यकारणी बैठकीत आवाहन

वाकोद ता जामनेर (प्रतिनिधी) – आपला समाज राज्यभर पसरलेला असून जवळपास २६ जिल्ह्यात संघटनेचे काम सुरु असून संघटनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी समाजापर्यंत पोहचुन त्यांच्या अडचणी समस्या जाणून घेऊन त्या सोडवन्यासाठी शासन दरभारी भांडता येईल यामुळे संघटना देखील वाढेल असे आवाहन जामनेर येथे अखिल भटका जोशी समाज सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारणी बैठकीत संस्थापक अध्यक्ष वामनराव मापारे यांनी केले ते अध्यक्ष स्थानावरुण बोलत होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य उपाध्यक्ष नंदुभाऊ मंडाळे यांनी केले तर संघटनेच्या कामाचा आढावा सचिव बाबासाहेब महापुरे यांनी मांडला श्री मापारे यांनी पुढे बोलतांना संघटनेच्या कामाविषयी सांगितले जवळपास 26 जिल्ह्यात संघटना कार्यरत असून आतापर्यंत संघटनेच्या माध्यमातून 600 विवाह जोडण्याचे काम केले असून समाजाच्या समस्या शासनापर्यंत पोच्चवल्या तसेच यापुढे देखील पदाधिकाऱ्यांनी समाजापर्यंत पोहचुन बैठका घेऊन निवेदने देऊन समाजाच्या समस्येला वाचा फोडावी असे आवाहन देखील श्री मापारे यांनी केले.
सुरेश जोशी, संदीप जोशी, साहेबराव जोशी, अनिल पवार, समाधान गुरहाळकर, नारायण गदाई, मोहन भवर, अनंत शिंदे, किशोर महाराज, सुरतसिंग जोशी, साकरु मोरे, शांतिलाल झुंगे, अशोक साळवे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळून केवळ पन्नास समाजबन्धावा मधे बैठक घेण्यात आली विलास जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले तर नंदू मंडाळे यांनी आभार मानले. यावेळी आत्माराम जोशी पांडुरंग महाराज, गणेश महाराज, मधुकर जोशी, अशोक जोशी, सुधाकर जोशी, सुरेश पहलवान, बाजीराव महापुर, रवि जोशी, दीपक जोशी आदि समाज बांधव उपस्थित होते.
महाराष्ट्र दर्शनद्वारे समाजाच्या प्रत्येक घटका पर्यंत पोहचनार:गेंदालाल झुंगे
महाराष्ट्र दर्शन हा उपक्रम लवकरच सुरु करणार असून त्यामाध्यमातून राज्याच्या कानाकोपरयात असलेल्या भटक्या जोशी समाज बांधवापर्यंत पोहचुन त्यांची माहिती घेऊन त्यांच्या समस्या जाणून सोडवन्यासाठी सर्वोतपरि प्रयत्न करणार असल्याची ग्वाही अखिल भटका जोशी समाज सेवा संघाचे महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष गेंदालाल झुंगे यांनी दिली.
प्रतिमा पुंजन व् दिप प्रज्वलन प्रसंगी संस्थापक अध्यक्ष वामनतात्या मापारे युवाध्यक्ष गेंदालाल झुंगे उपाध्यक्ष नंदू मंडाळे किशोर महाराज शांतिलाल झुंगे आदि







