औरंगाबाद (वृत्तसंस्था ) – जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक,गीतकार,संगीतकार,कथा पटकथा लेखक “योगेश तुळशीराम मोरे”यांची त्यांच्या निवासस्थानी मुंबई येथे कार्यरत असलेले एपीआय “भास्कर शिंदे” यांनी प्रत्यक्ष भेट घेतली असता,”योगेश मोरे”यांनी स्वतः लिहिलेली “भरकटलेल्या पक्षाचा किलबिलाट” कादंबरी भेट दिली.
तसेच एपीआय “भास्कर शिंदे” मराठी साहित्यिक ‘मोरे’यांना म्हणाले की,समाजात वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी धार्मिक साहित्य,धार्मिक ग्रंथ,कथा कादंबऱ्या,मराठी वांगमय याची समाजाला अत्यंत आवश्यकता असून,सर्वांनी वाचन संस्कृती टिकवून ठेवणे गरजेचे आहे;सध्या ऑनलाइनच्या युगात वाचन संस्कृती ही खालावलेली दिसून येत आहे;परंतु समाजात नव्या पिढीवर चांगले संस्कार घडवून आणण्यासाठी इतिहासकालीन,प्राचीन कालीन घडामोडी बद्दल सर्व शालेय विद्यार्थी मित्रांना माहितीचे आकलन होणे गरजेचे असून,यासाठी वाचन संस्कृती तयार करण्यासाठी सर्व ज्येष्ठ साहित्यिक,नवोदित लेखक यांनी परिश्रम नक्की घ्यायला हवे!अशी चर्चा या भेटीप्रसंगी झाली.तसेच “योगेश मोरे”यांनी लिहिलेल्या कादंबरीचे देखील एपीआय शिंदे यांनी कौतुक करून अभिनंदन केले.