मुंबई ( प्रतिनिधी ) – अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती आणि फळबागांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने १२२ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

मार्च, एप्रिल व मे या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या शेतीच्या व फळबागांच्या नुकसानीसाठी आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने मदत देण्यासाठी आवश्यक प्रस्ताव विभागीय आयुक्त याांच्याकडून मागविण्यात यावे असा निर्णय १२ मेरोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत
घेण्यात आला होता. या प्रस्तावांवर विचार करून राज्य सरकारने आता १२२ कोटी २६ लाख ३० हजार राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मंजूर केले आहेत.
शेती नुकसानीकरीता मदत 33 टक्के किंवा त्याहून जास्त नुकसान झालेल्याांना ही मदत मिळणार आहे कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक याांच्या सहीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार बँक खात्यात मदतीची रक्कम वर्ग करण्यात येईल रोखीने मदत दिली जाणार नाही मदतीची ही रक्कम खात्यावर आल्यावर कोणत्याही बँकेने त्या रकमेतून लाभार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची वसुली करू नये असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. महसूल व वन विभागाने राज्य सरकारचे उप सचिव संजय धारूरकर यांच्या सहीने हा आदेश जारी केला आहे







