जळगाव ( प्रतिनिधी ) – भाजीपाला घेऊन घरी जातांना तिघांनी वृद्धाच्या बोटातील सोन्याची अंगठी हिसकावून घेत पलयान केले दिवसाढवळ्या वृद्ध व्यक्तींना हेरुन लुटमारीचा हा प्रकार असा उघड झाला आहे.

कांतीलाल मिश्रीलाल जैन हे 71 वर्षाचे नागरीक पंचमुखी हनुमान मंदीराजवळ रणछोड नगर भागात राहतात. आज सकाळी ते भाजीपाला घेण्यासाठी सिंधी कॉलनी येथे गेले होते. बाजार केल्यानंतर ते रिक्षाने परत आले व पद्मावती मंगल कार्यालयाजवळ उतरले. त्यावेळी त्यांच्यावर तिघांनी पाळत ठेवली होती.
कांतीलाल जैन पद्मावती मंगल कार्यालयापासून पायी जात होते. त्याचवेळी एक जण त्यांच्या मागे पळत आला. त्याने त्यांना थांबवले. त्याचवेळी त्याचे दोघे साथीदार मोटार सायकलवर आले. दोघांनी वृद्ध कांतीलाल जैन यांना धरुन ठेवले. अगोदर आलेल्या इसमाने त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी काढून घेतली. परिसरात कुणीच नसल्याचा गैरफायदा घेत तिघांनी पलायन केले.
कांतीलाल जैन यांनी आरडाओरड केली. मात्र त्यावेळी परिसर निर्मनुष्य असल्यामुळे चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. 24 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी हातातून गेल्याने कांतीलाल जैन हतबल झाले होते. त्यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठत हकीकत कथन केली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.






