राका फर्निचरजवळील दुर्देवी घटना
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कैलास जाधव हे मेहरुण परिसरातून महामार्ग ओलांडत होते. त्या वेळी भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा रात्रीच्या सुमारास मृत्यू झाला.
शनिवारी सायंकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान, अपघातानंतर संबंधित वाहन चालक पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.









