जामनेर (प्रतिनिधी) ;- तालुक्यातील हॉटस्पॉट ठरलेल्या गावामध्येरॅपिड तपासणी करून कोविड रुग्ण लशोध मोहीम सुरू केली आहे.

स्वतः आ. गिरीश महाजन हे मैदानात उतरून रुग्णाची शोधमोहीम सुरू केल्याने आरोग्य यंत्रणा कामाला लागलेली आहे. आज जामनेर तालुक्यातील भराडी या गावामध्ये स्वतः अँब्युलन्स व वैद्यकीय पथकासह जाऊन त्यांनी आज कोविड रुग्ण शोध मोहीम सुरू केली. या गावात अवघ्या ३४ रुग्णांमध्ये ७ रुग्ण हे पॉझिटिव्ह आले होते. उशिरापर्यंत तपासणी याआधी मृत्यूचे तांडव सुरू असलेल्या कुऱ्हाड गावा मधील कोविड रुग्न शोधमोहीम सुरू केल्याने त्या गावांमध्ये बऱ्याच प्रमाणात रुग्ण संख्या कमी झाले आहे.भराडी व तालुक्यातील ३७ गाव हॉटस्पॉट ठरले आहेत. या सर्व गावांमध्ये अशा प्रकारे कोविड शोध मोहीम स्वतःहून सुरू केले आहे.







