जळगावात स्वातंत्र्यवीर चौकात घडली होती घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- स्वातंत्र्यविर चौक परिसरात चौघांकडे गावठी कट्टा आढळून आल्याप्रकरणी तसेच पोलिसांना धक्काबुक्की केल्या प्रकरणात चौघांना सुनावण्यात आलेल्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांची शनिवारी दि. १० रोजी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
संशयित गुन्हेगारांमध्ये चेतन रमेश सुशीर (१९, रा. पिंप्राळा हुडको), लखन दिलीप मराठे (३०, रा. शिवाजीनगर हुडको), सोनू उर्फ ललित गणेश चौधरी (२९, रा. ईश्वर कॉलनी), अतुल क्रिष्णा शिंदे (२५, रा. रामेश्वर कॉलनी) यांचा समावेश आहे. स्वातंत्र्यवीर चौक परिसरात गुरुवार, ८ फेब्रुवारी रोजी चार जण वाद घालत असताना पोलिस त्या ठिकाणी पोहचले होते. त्या वेळी पोलिसांना चौघांनी धक्काबुक्की करत धमकी दिली होती. त्या वेळी त्यांच्याकडे गावठी कट्टा आढळून आला होता. या प्रकरणात चेतन सुशीर, लखन मराठे, सोनू उर्फ ललित चौधरी, अतुल क्रिष्णा शिंदे यांना एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. शनिवार, १० फेब्रुवारी रोजी पोलिस कोठडी संपल्याने चौघांना न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायलयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.