बीएचआर प्रकरणात सागर भंगाळे यांच्याकडून खुलासा
जळगाव(प्रतिनिधी ) बीएचआर अपहार प्रकरणात व्यावसायिक भागवत भंगाळे यांना चौकशी करिता ताब्यात घेण्यात आले असले तरी त्यांनी पतसंस्थेचे कर्ज २००८ मध्ये परतफेड करून कर्ज निरंकचा दाखला देखील घेतला होता. अशी माहिती सागर भंगाळे यांनी दिली.
जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक असलेल्या भागवत गणपत भंगाळे यांना आज १७ रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशीकामी ताब्यात घेतले आहे. भागवत भंगाळे यांनी बीएचआर पतसंस्थेमधून ४ एप्रिल २००७ रोजी २५ लाख मुदत कर्ज घेतले होते.
या कर्जाची परतफेड त्यांनी २२ मे २०१८ रोजी केली असून त्याचा निरंक दाखला देखील घेतला आहे. भंगाळे यांनी कर्जपोटी तारण ठेवलेली मेहरूण शिवारातील मालमत्ता रिलीज केल्याचे पत्र २२ मे २०१८ रोजी त्यांना दिले असल्याची माहिती सागर भंगाळे यांनी दिली आहे.