जळगाव (प्रतिनिधी) – मित्रांचे भांडण सुरु असताना मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला दोन जणांनी बेदम बदडल्याची घटना तालुक्यातील शेळगाव येथे घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, भूषण पाटील वय 36 रा. शेळगाव ता.जि. जळगाव हा तरुण शेती करीत असून २७ जानेवारी रोजी सायंकाळी कानसवाडा फाट्याजवळ भुषण पाटील आणि त्याचा मित्र संदीप धांडे हे दोघे उभे होते. काहीही कारण नसतांना गावातीलच लोकेश एकनाथ पाटील आणि सोबत अनोळखी तरूण यांनी येऊन संदीप धांडे याला मारहाण केली. मारहाण सुरू असल्याचे पाहून भुषण पाटील याने मध्ये पडून मारहाण का करताहेत याची विचारणा केली असता लोकेश आणि त्याच्यासोबत असलेल्या एकाने भूषण पाटील व त्याचा मित्राला बेदम मारहाण करून शिवीगाळ केली, तर रस्त्यावर पडलेली लाकडी पाटीने भूषणच्या डोक्याला मारहाण करून दुखापत केली.याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्धगुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार संजय जाधव करीत आहे.








