धरणगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील बांभोरी येथील एका बंद घरातून अज्ञात चोरटयांनी घरफोडी करून सव्वा लाखांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना घडली आहे याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय परशुराम पाटील (वय ५७, रा. बांभोरी, ता. धरणगाव) हे बाहेर गेले होते. १६ जून रोजी रात्री कधीतरी चोरटयांनी त्यांच्या घरात प्रवेश करून चोरी केली. यात सोन्याचे दागिने, देव्हाऱ्यातील देव आणि कपाटातील रोख रक्कम अशी एकूण १ लाख १८ हजार ५८३ रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.
याप्रकरणी संजय पाटील यांनी फिर्यादीवरून धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस चोरट्यांचा शोध घेत असून पोहेकॉ राजेंद्र कोळी करीत आहेत.